व्यवसाय बदलला तरी भटकंती सुरू| Baramati | Supe | Maharashtra | Sakal Media
सुपे (Supe)- तुंबडी काढणार..., डबे, चाळाण करणार..., सुया घ्या..., बिब्बा घ्या..., दाभण घ्या... बाईईई... अशी आरोळी आता ऐकायला येत नाही. पूर्वीपासून दारोदार भटकणाऱ्या वैदू समाजाने (Vaidu Community) कालपरत्वे व्यवसाय बदलला असला तरी त्यांची भटकंती मात्र अद्याप चालू आहे. जगण्यासाठी सरकारने कर्ज स्वरूपात मदत द्यावी. अशी या समाजातील कुटुंबाची मागणी आहे. सुपे (ता.बारामती) (Baramati)येथे वैदू समाजाचे अनेक कुटुंब मुलाबाळांसह उदरनिर्वाहासाठी आलेले आहेत. जागा मिळेल तिथे पाल ठोकून राहतात. परिसरातील गावोगाव जाऊन रोजच्या वापरातील वस्तु विकून कुटुंबाचा गाडा चालवत आहेत. पूर्वी हा समाज तुंबडी काढणे व झाडपाल्याची औषधे देत होती. कोणी डबे, चाळण तयार करून देत होते. हा व्यवसाय बंद झाल्याने या समाजाने भंगार गोळा करणे, गॅस, कुकर, मिक्सर दुरूस्ती करून देणे, केसावर भांडी विकणे, आरसा, फणी, कंगवे, बांगड्या विकणे असे व्यवसाय सुरू केले असले तरी त्यांची भटकंती अद्याप चालूच आहे. (व्हिडिओ- जयराम सुपेकर)
#Supe #Vaiducommunity #Baramati